Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीरोजगार मिळाला गावातच, पण मजुरी मिळेना धावतच..!-एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची...

रोजगार मिळाला गावातच, पण मजुरी मिळेना धावतच..!-एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी थकली…-गडचिरोली जिल्ह्यातील मजुरी १ कोटींच्या वर प्रलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- गावातील अकुशल मजुरांना गावातच रोजगार मिळावा; यासाठी रोजगाराची हमी असलेला कायदाच तयार करण्यात आला.त्यानुसार यंत्रणा स्तर आणि पंचायत स्तरावरून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाऊन मजुरांच्या हाताला काम मिळू लागले व काही प्रमाणात उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू लागला आहे.मात्र,रोजगार मिळाला गावातच,पण मजुरी मिळेना धावतच..! असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी थकली असल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्याच्या घडीला सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतीचा हंगाम सुरु झाला आहे.शेतीसाठी पैश्याची जुळवाजुळव अनेकांना करावी लागत असते. अशातच१५ दिवसांच्या आत मजुरांना मजुरी मिळावी,असा निकष आहे.मात्र,महिना लोटूनही मजुरी न मिळाल्याने मजुरांना आर्थिक बाब भेडसावत आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामे करण्याऱ्या मजुरांना १०० दिवसांचा रोजगार रोहयोतून उपलब्ध करुन दिला जातो.रोहयोतून सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरुपाची अकुशल,कुशल कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.१८ वर्षांवरील नोंदणीकृत मजुरांनी कामाची मागणी केल्याने मजुरांना कामे मिळाली.मात्र,१५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी देण्याची तरतूद असताना महिनाभरापासून मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या १६ दिवसानंतर प्रतिदिन मजुरीच्या ०.०५ टक्के दराने विलंब आकार(डीले पेमेंट) दिला जातो.अशातच झालेला डीले पेमेंट संबंधितांकडून वसूल करण्यात येतो.मात्र,शासनाकडून रक्कम अदा करण्यात आली नसेल तर असा डीले झालेला पेमेंट कुणाकडून वसूल करणार?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांची जवळपास १ कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांची मजुरी थकीत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी संबंधित मजुरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा होणे आवश्यक आहे.मात्र,एक महिना लोटूनही मजुरी मिळाली नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनाने लवकरात-लवकर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी अदा करावी; अशी मागणी मजूर वर्गांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!