Monday, July 13, 2026
Homeनागपूररेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात असून फाईलींचा गट्टा तयार झालेला आहे.विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेतीचे प्रकरण दाबल्या गेलेत अन् एका रेतीच्या ट्रकमुळे ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. याविषयावर न बोललेले बरे.कारण की ते तुम्हालाही कळतेच,हे सांगण्याची गरज नाही.२८ ऑक्टोंबर २०२५ च्या रात्री ब्रम्हपुरीचे एसडीपीओ म्हणजेच उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी चिमूर येथील एमएच ३६ एए ९८३३ या क्रमाकांचा रेतीने भरलेला हायवा ट्रक पकडला होता.मात्र,त्यावर कोणतीही कारवाई न करता तो हायवा ट्रक चिमूर ठाण्यातच तब्बल दहा दिवस उभा केला होता. याबाबत तक्रारी झाल्या आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अप्पर अधीक्षकांची समिती नेमून चौकशी केली असता,हायवामालकाने ५० हजार रुपये दिल्याचे समोर आले.तसा चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांनी पोलिस महानिरीक्षकांच्या माध्यमातून पोलिस महासंचालकांकडे पाठवला होता. मात्र,अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.अश्यातच यासंदर्भात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.त्यांनी सांगितले की,ब्रम्हपुरीचे एसडीपीओ वाळू माफियांना संरक्षण देत आहेत,तसेच आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करत आहेत.त्यासोबतच,भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी एसडीपीओची हिंमत इतकी वाढली आहे की,आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही,असा दावा तो करत आहे.त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे,अशी मागणी  केली.प्रकरणी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याचे सांगितले.चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.तत्पूर्वी विभागीय चौकशीदरम्यान जाधव यांची बदली करण्यात येईल,असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!