Monday, August 31, 2026
Homeनागपूरआमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक बदनामी करतांना दिसून येतात. सर्वसामान्य नागरिकांकडे कुठलाही पॉवर नसल्याने जाऊ द्या ना..!आपल्याला काय करायचे? असे म्हणून विषय वाढवण्याचे टाळत असतात.मात्र,एखाद्या लोकप्रतिनिधीची नाहक बनामी करून बातम्या प्रसारित करणे चार ‘यूट्यूब’ चॅनल पत्रकारांना चांगलेच महागात पडले आहे.प्रकरणी काल शनिवारी चार पत्रकार व एक संपादक यांचेवर विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून विशेषाधिकार समितीने चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासात पाठविण्याची शिफारस केली आहे.
अकोल्यातील ‘सत्य लढा'(Satya Ladha News) या यूट्यूब चॅनलने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य(आमदार)अमोल मिटकरी यांच्या बाबतीत बदनामीकारक तसेच तथ्यहीन वृत्त प्रसारित केले होते. यामुळे मिटकरी यांची प्रतिमा मलिन झाली होती. संबंधित यूट्यूब चॅनलचे पत्रकार गणेश सोनावणे,हर्षदा सोनावणे,अमोल नांदुरकर,अंकुश गावडे व संपादक सतीश देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाची हक्कभंग विशेषाधिकार समितीद्वारे चौकशी झाली.समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘सत्य लढा’ यूट्यूब चॅनलवरून अमोल मिटकरी यांच्याबाबत खोटे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले.यामुळे एका लोकप्रतिनिधीची राजकीय प्रतिष्ठा मलिन झाली असून हा विशेषाधिकारांचा भंग ठरतो.या प्रकरणात संपादकाने लेखी माफी मागितल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याची शिफारस समितीने केली आहे.तर उर्वरित चारही जणांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.जेव्हा विधिमंडळाचे सत्र सुरू असेल त्या कालावधीत त्यांना कारावासात पाठविण्यात यावे,अशी शिफारस समितीने केली आहे. जर या सत्रात कारावास झाला नाही तर पुढील विधिमंडळ सत्रात याची पूर्तता करण्यात यावी असेही समितीने अहवालात स्पष्ट केले.यामुळे सोशल मीडिया असो वा डिजिटल माध्यम असो एखाद्या बाबीचे तथ्य तसेच सत्यता पडताळूनच पुढील पाऊल उचलणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!