Saturday, October 24, 2026
Homeमुंबईराष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाचा दणका 

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाचा दणका 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डिसेंबर २०२१ मध्ये दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होत्या.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असतानाही ममता बॅनर्जी बसून राहिल्या.काही सेकंदांनी त्या अचानक उठल्या आणि दोन ओळी गाऊन गप्प झाल्या यानंतर तिथून निघून गेल्या.

ममता बॅनर्जींच्या या वर्तनाने संतप्त झालेले भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी मार्च २०२२ मध्ये कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते.ममता बॅनर्जी यांनी जानेवारी २०२३ मध्ये विशेष MP-MLA कोर्टात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले.त्यावर न्यायालयाने दंडाधिकार्‍यांना तक्रारीवर नव्याने विचार करण्यास सांगितले होते, तर ममता यांची तक्रार रद्द करण्याची मागणी होती.

MP-MLA न्यायालयातून त्यांच्या बाजूने निर्णय न मिळाल्याने ममता यांनी उच्च न्यायालयात अपील केले, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याऐवजी तक्रार रद्द करण्याची मागणी केली. परंतु, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही तक्रार रद्द करण्यास नकार दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!