Saturday, June 27, 2026
Homeनागपूररात्र होऊनही घरी परतलाच नाही; शोध घेतला असता आढळला मृतावस्थेत..

रात्र होऊनही घरी परतलाच नाही; शोध घेतला असता आढळला मृतावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील पवनी गावालगतच्या मोदी शेत शिवारात शेतात काम करीत असलेल्या शेत मजुरावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याने वनविभागप्रती संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे,घटना घडल्यानंतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये,यासाठी घटनेबाबत वनविभागाने गोपनीयता बाळगली होती.अशोक उईके वय ५० वर्षे, रा.मोदी,ता.रामटेक,जि.नागपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतमजुराचे नाव असून तो काल शुक्रवारी अग्रवाल यांच्या शेतावर काम करत होता.अशोक उईके हा रात्र होऊनही घरी परतला नसल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी मोदी गावालगत असलेल्या शेत शिवारात शोध घेतला असता छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.लागलीच घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.घटनेच्यावेळी शिवारात कुणीही नसल्याने हा हल्ला कुणाच्याही लक्षात आला नाही.त्यामुळे कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही आणि घटनेबाबत गोपनीयता बाळगण्यात आली.सदरची घटना रात्री उशिरापर्यंत माहिती झाल्याने सदर प्रकार उजेडात आला.रात्रीच्या सुमारासच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला.घटनेने परिसरात दहशत पसरली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी मोदी ग्रामवासिय जनतेनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!