Saturday, October 10, 2026
Homeगडचिरोलीरब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणीस सुरुवात... - आता गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत...

रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणीस सुरुवात… – आता गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासन स्तरावरून राज्यात रब्बी हंगामासाठी १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे.महसूल विभागाद्वारे यासाठी मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पीकपेरा नोंदविता येणार आहे; अशी नोंद नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना शासन योजनांचा लाभ तथा नुकसानभरपाई मिळणे कठीण होणार आहे.
या प्रकल्पात सुरुवातीला १ डिसेंबर ते १५ जानेवारी, असा दीड महिना शेतकरी स्तरावर नोंद घेतली जाणार आहे.त्यानंतर १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत सहायकांमार्फत ई-पीक पाहणी होणार आहे.यासाठी ॲप डाऊनलोड करून डिजिटल क्रॉप सर्वेक्षणामध्ये गटाच्या हद्दीवर जाऊन जोपर्यंत पीक पाहणी करणार नाही,तोवर पिकांचे छायाचित्र काढता येणार नाही, शिवाय अपलोड करता येणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून पेरणी केलेल्या पिकांची फोटो अपलोड करायची आहे.तसेच शेतशिवारातील झाडेही या माध्यमातून नोंदविता येणार आहेत.शेतकऱ्यांनी यासंबंधी दक्षता घेण्याची गरज आहे.पीकविमा,पीक कर्ज,नैसर्गिक आपत्तीची मदत,शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर पिकांची ऑनलाइन नोंदणी यासह अन्य महत्त्वाच्या कामांसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आलेली आहे.
पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे.यामध्ये पिकांचे दोन फोटो घ्यावे लागतात.शिवाय गावासाठी नियुक्त सहाय्यक शेतकऱ्यांची मदत घेता येणार आहे.महसूल अधिकारी,शेतकरी स्तरावर झालेल्या ई-पीक पाहणीची पडताळणी करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!