Monday, April 27, 2026
Homeनागपूररखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. - आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर पुढील मे आणि जून महिन्यात काय अवस्था होणार?सांगणे कठीण आहे.अश्यातच हवामान विभागाने आज,सोमवार २७ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानंतर,उद्या २८ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी ढगाळ वातावरण राहणार.विशेष म्हणजे,काल रविवारी नागपूरचे तापमान ४५.४ अंशांच्या उच्चांकीवर पोहोचले व तीव्र उन्हामुळे नागरिकांची त्वचा भाजते की काय,अशी जाणीव झाली.त्यातच,वाढत्या तापमानाचे गंभीर परिणाम दिसत असून बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्धाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी उघडकीस आली.लग्नसमारंभ असल्याने  दुपारच्या सुमारास बसने काटोल येथे जायला निघाले. पण,रखरखत्या उन्हामुळे त्यांना बसमध्येच अस्वस्थ वाटू लागले.मात्र,त्यांनी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. बस काटोल शहरातील बसस्थानकाच्या आवारात पोहोचताच ते निपचत पडून असल्याचे दिसताच काही प्रवाशांना शंका आल्याने त्यांनी काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.  लक्ष्मण अमृत पाटील वय ७५ वर्षे,रा.मांडवी,ता. कळमेश्वर,जि.नागपूर असे मृत प्रवाशाचे नाव आहे.यावरून रखरखत्या उन्हात बाहेर न पडलेले बरे.काल रविवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यात खतरनाक तापमानाची नोंद करण्यात आली.तापमानात अग्रस्थानी अकोला जिल्हा ठरला. अकोला-४६.९०,अमरावती-४६.८०,वर्धा-४६.४०, यवतमाळ-४६.००,नागपूर-४५.४,चंद्रपूर-४५.००, वाशिम-४४.६०,गडचिरोली-४४.६०,गोंदिया-४४.४०,ब्रम्हपुरी-४४.२०,भंडारा-४४.०० तर बुलढाणा-४३.५०.

उन्हाळ्याची परिस्थिती लक्षात घेता,सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

असे कोण करते सांगा? ग्रामसेविकेने शासकीय निधी सरकारी कामासाठी न वापरता चक्क व्याजाने दिले वाटून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासन स्तरावरून गावगाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधीचे वाटप करण्यात येते.मात्र,काही लोकसेवक मनमर्जिने कामे करून घरचीच...

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!