- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे चावी वितरण व ई-गृहप्रवेशाचा प्रतिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन येत्या १७ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत गडचिरोली जील्ह्याकरिता १४ हजार ९५१ एवढे उदिदष्ट दिले आहे.याअंतर्गत दिनांक- १७ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता ऑनलाइन वितरित करण्यांत येणार आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात येणार आहे.यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यांनी केले आहे.
- Advertisement -

