Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीयुवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार... - यवतमाळच्या आर्णी तालुक्यात जिल्हास्तरीय एक...

युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार… – यवतमाळच्या आर्णी तालुक्यात जिल्हास्तरीय एक दिवसीय कवीसंमेल संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यात जिल्हास्तरीय एक दिवसीय कवीसंमेल काल,२२ सप्टेंबरला पार पडले.देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कवी भिडेवाडाकार विजय वडवेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविल्या जात आहे.यवतमाळ जिल्हा अंतर्गत येणाऱ्या आर्णी तालुक्यात जिल्हास्तरीय एक दिवसीय कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी
आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे मु.अडपल्ली चक,ता.मुलचेरा, जि.गडचिरोली यांनी सुद्धा या संमेलनात सहभाग नोंदविला होता.त्यांनी सदर संमेलनात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भिडेवाडा बोलला’ ही कविता सादर करून उपस्थित मान्यवर,कवी,कवयित्री व रसिकांची दाद मिळवित सर्वांची मने जिंकली.गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असणारे अवघे अठ्ठावीस वर्षाचे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांनी आपल्या परिस्थितीला तोंड देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच अशी गगन भरारी मारली आहे.जिल्हास्तरीय एक दिवसीय कवीसंमेलन प्रसंगी उत्कृष्ट कविता सादरीकरण केल्याने यवतमाळ जिल्हा कमिटीने भिडेवाडाकार विजय वडवेराव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!