Monday, May 25, 2026
Homeजळगावयुट्यूबरवर व्हिडीओ पाहून बनवायचा नकली नोटा; माहिती पडताच खाल्ली जेलची हवा

युट्यूबरवर व्हिडीओ पाहून बनवायचा नकली नोटा; माहिती पडताच खाल्ली जेलची हवा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 जळगाव:- चोरी करणारा कितीही शातिरअसला तरीही एक ना एक दिवस सापडला जातोच; अशाच प्रकारचा तरुण झपटप पैसे कमवून श्रीमंत होण्यासाठी त्याने चक्क नकली नोटा बनविण्याची शक्कल लढविली.युट्यूबरवर व्हिडीओ पाहून नकली नोटा सुध्दा बनविल्या.मात्र,ही शक्कल त्याला चांगलीच महागात पडली असून त्याच्यावर जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे.नकली नोटा बनविणाऱ्या एका मजुर तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून तब्बल ४६ हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.देविदास पुंडलिक आढाव वय ३० वर्षे,राहणार कुसुंबा तालुका जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

कुसुंबा गावातील देविदास आढाव हा एमआयडीसीतील व्ही सेक्टर येथे भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी बुधवारी एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून संशयित देविदास आढाव याला रंगेहात पकडून अटक केली.

त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीत जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या.त्याने भारतीय चलनातील १००,२०० तसेच ५०० रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविल्या होत्या.युट्यूबवर व्हिडीओ पाहून या नकली नोटा तयार केल्याची कबुली संशयित देविदास याने दिली आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट नोटा तयार करुन त्या वापरात आणण्याची टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, यात देविदास याचे काही साथीदार आहेत का? याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.दरम्यान, संशयित देविदास याला पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे ॲड स्वाती निकम यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!