उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मागील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती.पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.पावसाच्या पाण्याने कहर करून सोडला होता.त्यामुळे नदी,नाले,रस्ते जलमय झाल्याने सर्वत्र डबक्यांमध्ये पाणीच पाणी साचले.साचलेल्या पाण्यात जंतू,मच्छर,डास व कीळे यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढीस लागला.अशातच हल्ली पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्यातही ऊन व पावसाचा खेळ सुरू झाल्याने हवामानात बदल होत आहे.बदलत्या वातावरणामुळे रोगराई अधिकच फोफावली आहे.
हवामान बदलामुळे अनेकांची रोग प्रतिकार क्षमता कमी होत असते.त्यामुळे काही जणांना ताप,सर्दी, खोकला,अंग जळ होणे,मळमळ वाटणे,अंगदुखी, डोकेदुखींचे प्रमाण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्याने दावाखण्यात रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
तज्ञांच्या मते,आरोग्याची काळजी घ्यावी; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध सेवन करू नये; रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता फळांचे सेवन करून,व्यायाम करणे आवश्यक आहे.सध्या सर्वत्र वायरलचे रुग्ण आढळून येत आहेत.कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये; असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

