Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीमौशिखांब येथे स्वच्छता व आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मौशिखांब येथे स्वच्छता व आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- विदर्भ कोकण ग्रामीण बँक गडचिरोली तथा नवदृष्टी युवती मंडळ साखरा यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली तालुक्यातील मौजा मौशिखांब येथे “स्वच्छता व आर्थिक जनजागृती कलापथक तसेच मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमचे प्रमुख अतिथी म्हणून महादेव राणे क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंद्रपूर,गजानन माद्दसवार वरिष्ठ व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक गडचिरोली,रुपाली गांधारवार उपसरपंच ग्रामपंचायत मौशिखांब योगाजी सावकार बनपूरकर,प्रतिष्टीत नागरिक मौशिखांब संस्थेच्या सचिव अर्चना चुधरी,दिनेश बोरकुटे सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली व इतर मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम मध्ये कलापथकाचे माध्यमातून कलावंतांनी स्वच्छता यात परिसर स्वच्छता स्वच्छतेचे फायदे हागणदारी मुक्त गाव,अस्वच्छतेमूळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच ग्राम विकासात ग्राम सभेचे महत्व,बँकेच्या विविध योजना यात पंतप्रधान विमा योजना,जीवनज्योती विमा योजना पेन्शन योजना,अटल पेन्शन योजना,जनधन योजना तसेच विम्याचे सर्वसामान्य लोकांना होणारे फायदे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.

 तसेच महादेव राणे क्षेत्रीय व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंद्रपूर यांनी बँकेच्या योजणांचा जास्तीत लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे संचालन गणपत मोहुर्ले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव अर्चना चुधरी यांनी मानले.कला पथकातील गणपत मोहुर्ले,पवन भांडेकर,यमराज तुंकलवार,विनायक कोलपल्ली,राणा कोवे,शुभम रामटेके,सुनील मोहुर्ले,जयंती हर्षे,सचिन गोरडवार,कु.नाजुका गेडाम व प्रणाली यांनी उत्तम असे सादरीकरण केलेकार्यक्रममध्ये मौशिखांब येथील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!