Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीमोफत तीर्थक्षेत्रांना जायचेय; तर करा अर्ज.. - "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना"..

मोफत तीर्थक्षेत्रांना जायचेय; तर करा अर्ज.. – “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत,त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
सदर योजनेकरीता लाभार्थ्याचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे,(वयाच्या पुराव्यासाठी टी.सी./ जन्म प्रमाणपत्र),लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त अडीच लाख किंवा पिवळे/केशरी रेशन कार्ड असावे,शारीरिकद्दृष्टया निरोगी आणि मानसिकद्दृष्टया निरोगी व प्रवासासाठी सक्षम असल्याचे आणि संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र,महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,(अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला ग्राह्य धरण्यात येईल.)योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी बाबी असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. सन २०२६-२७ या कालावधीसाठी महाबोधी मंदिर, बोधगया,बिहार या तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी येत्या,१० मे २०२६ पर्यत (पुर्ण पत्तासह, मो.क्रमांक,वय)अर्ज सादर करण्यात यावे.सदर यात्रा येत्या,२५ मे २०२६ च्या दरम्यान चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून यात्रेकरीता रेल्वे निघणार आहे.सदर योजनेच्या परिपुर्ण माहितीसाठी कार्यालय,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,एल.आय.सी.ऑफिस रोड गडचिरोली या कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.सचिन मडावी,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!