Thursday, October 15, 2026
Homeमुंबईहेलिकॉप्टरने उड्डाण भरली अन् वादळ-वाऱ्याचा जोर.. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आठ जण...

हेलिकॉप्टरने उड्डाण भरली अन् वादळ-वाऱ्याचा जोर.. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आठ जण हेलिकॉप्टरमध्ये; इमर्जन्सी लँडिंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज,गुरुवार ७ मे रोजी दुपारच्या सुमारास अचानकपणे बदलेल्या खराब हवामानाचा मोठा फटका बसला.मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स येथून उड्डाण भरलेला हेलिकॉप्टर काही वेळातच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडला.अश्यातच वैमानिकाने(पायलट)प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लगेचच सुरक्षितपणे खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला.
एकनाथ शिंदे हे आज ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि मुरबाडच्या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे,स्विय सहाय्यक प्रभाकर काळे,मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक पात्रूडकर, ओएसडी राजपूत,मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी तसेच पायलट असे एकूण आठ जण होते. हेलिकॉप्टर उड्डाणानंतर थोड्याच वेळात वादळात अडकले.सोसाट्याचा वादळी वारा आणि खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.अश्यातच संकटाचे स्वरुप लक्षात घेता पायलटने नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून  हेलिकॉप्टर वादळाच्या तडाख्यातून बाहेर काढून सुरक्षितरित्या मुंबईतील जुहू विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. यानंतर हेलिकॉप्टरमधील आठ जण सुरक्षितरित्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडले.सर्वजण सुरक्षित आणि सुखरुप असून पायलटने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!