Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी..! अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर..जयंत पाटील यांचा राजीनामा..

मोठी बातमी..! अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर..जयंत पाटील यांचा राजीनामा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठा बदल करीत पक्षाची संपूर्ण जबाबदारी यापुढे शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे.विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा,अशी मागणी केली  होती.त्यानंतर आज,शनिवार १२ जुलै रोजी अखेर जयंत पाटील यांची ही मागणी पूर्ण झाली आहे.जयंत पाटील  यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून ते येत्या १५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा  पदभार स्वीकारणार आहेत.जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदसांभाळत होते.त्यांच्या नेतृत्वात अनेक मोठ्या निवडणुका पक्षाने लढवल्या होत्या.काही ठिकाणी त्यांना यश आले तर काही ठिकाणी अपयश आले होते.त्यानुसार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा,अशी मागणी केली  होती.मला पवारसाहेबांनी बरीच संधी दिली.सातवर्षाचा कालावधी दिला.शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती  करेन, शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे.पवार साहेबांनी  यावर योग्य निर्णय घ्यावा.आपल्याला बरेच पुढे जायचे आहे,असे जयंत पाटील म्हणाले होते.त्यानंतर अखेर आज शनिवारी त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!