Thursday, September 24, 2026
Homeलाखांदूरमूळव्याध उपचारासाठी घेतले २५ हजार रुपये अन् डॉक्टरचा भांडाफोडच झाला…-डॉक्टरवर विविध कलमान्वये...

मूळव्याध उपचारासाठी घेतले २५ हजार रुपये अन् डॉक्टरचा भांडाफोडच झाला…-डॉक्टरवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल; लाखांदूरातील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लाखांदूर(भंडारा) :-महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेअंतर्गत नोंदणीकृत नसताना अनधिकृतपणे रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य समितीच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून बोगस डॉक्टरला अटक केली.अरिदम शिबू बिश्वास वय २७ वर्षे,रा.आंबेडकर वार्ड,लाखांदूर असे तथाकथित डॉक्टरचे नाव आहे.ही कारवाई दोन दिवसांपूर्वी गुरुवारी दि.२७ जून रोजी करण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर बनगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या अरिदम बिश्वास यांनी काही दिवसांपूर्वी लाखांदूर येथील आंबेडकर वॉर्डामध्ये भाड्याच्या घरात आपले खासगी रुग्णालय सुरू केले.काही दिवसांपूर्वी मांदेड येथील रहिवासी महिला रुग्ण मूळव्याध उपचारासाठी त्याच्याकडे गेली होती.यावेळी त्या डॉक्टरने महिला रूग्णाला २५ हजार रुपयांचा खर्च सांगितला.तिच्यावर मूळव्याध रोगाचा उपचार केला.परंतु उपचार करूनही महिला रूग्णाला आजारातून आराम मिळाला नाही.डॉक्टर बोगस असल्याचा संशय घेऊन पीडित महिला रुग्णाने तालुका आरोग्य विभागाकडे तक्रार केली.या तक्रारीवरून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वंदना पडोळे,पंचायत समितीच्या बीडीओ नमिता बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ.दत्तात्रय ठाकरे,आरोग्य विस्तार अधिकारी मोहन बावनकर,डॉ. राजेश मडावी,भरत गणवीर,देमा सोंगे,विनोद मेश्राम, पोलिस हवलदार उमेश शिवनकर,अविनाश खरोले आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही सरकारी पंचाच्या उपस्थितीत बोगस डॉक्टरचे खासगी रुग्णालय गाठून मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीबाबत चौकशी केली. यावेळी सदर डॉक्टर रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करत असल्याचे तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी न करता औषधोपचार देत असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वंदना पडोळे यांनी लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.रुग्णालयातून ४० हजार १२६ रुपये किमतीची औषधे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे,पोलिस नायक सुभाष शहारे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!