Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीमुख्यालयी राहणे अनिवार्य; अन्यथा कारवाईचा बडगा….-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले...

मुख्यालयी राहणे अनिवार्य; अन्यथा कारवाईचा बडगा….-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले पत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शासन स्तरावरून कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बाबत परिपत्रक काढूनही कित्तेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने आम जनता व गोर-गरीब नागरिकांची कामे खोळंबली जाऊन अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.अशातच पहिल्यांदाच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नुकतेच सर्व विभाग प्रमुखांच्या नावे पत्र काढून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहावे,जे कर्मचारी मुख्यालयात राहणार नाहीत,त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामस्तर,तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे.कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी आपल्या अधिनस्त कर्मचारी मुख्यालयात राहतात की नाही,याची माहिती घ्यावी.त्याचबरोबर सर्व कार्यालय प्रमुख,गटविकास अधिकारी,विभाग प्रमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.जे कर्मचारी सरकारी निवासस्थानात राहतात; अशा कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालय प्रमुखास प्रमाणित करणे, जे कर्मचारी निवासस्थानात राहत नाही,अशा कर्मचाऱ्यांच्या भाडे कराराची कागदपत्रे मागणे,संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यालय प्रमुख नियमानुसार प्रशासकीय कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे; असे पत्रात म्हटले आहे.सीईओंच्या या पत्रामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!