- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण सहाय्य दिले जाईल.तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जातील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबविण्यात येत आहे.हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंद घरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला आहे.या करारा अंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर केले जाईल. या प्रकल्पानुसार ‘नंदघर’ मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटासाठी मुलांना बाल शक्षण तसेच आरोग्य व पोषण सहाय्य देण्यात येणार आहे.तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील.
३८६७ बालकांना मिळणार पोषण आहार👇
शंभर अंगणवाड्यांमध्ये एकूण ० ते ६ वर्षांची ३ हजार ८६७ बालके व ६०२ गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे.याचबरोबर ११३४ किशोरी मुलींना दुपारच्या सत्रात उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे.हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे.
या उपक्रमा अंतर्गत अंगणवाड्यांची रंगरंगोटी, बालमैत्रीय सजावट, ई-लर्निंगसाठी LED टीव्ही/टॅबलेट यासह मूलभूत सुविधांचा समावेश आहे.तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई-लर्निंग व आरोग्यसेवांसाठी आशा वर्कर्स व ANM चे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी देणे,जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणे, ब्रँडिंग व देखभाल करणार आहेत.अंगणवाड्यांमध्ये पाणी,स्वच्छतागृह,वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे.त्यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीत विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.
- Advertisement -

