Thursday, September 3, 2026
Homeनागपूरमुखी 'जय भीम' चा जोश; हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान...

मुखी ‘जय भीम’ चा जोश; हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांच्या थवे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दिन- दलितांचेच नव्हते.तर सर्व समाज घटकातील शोषित, पीडित,वंचित दिनदुबळ्यांचे कैवारी होते.त्यांनी केवळ एकाच समाजाचा विचार केला नाही,तर सर्व घटकांचा विचार अंगिकारून पुढील भवितव्याची तजवीज  केली. मात्र,आजही बैलबुध्दी,बिनडोक बुध्दीचे काही लोकं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले?म्हणून वायफळ गोष्टी करतांना दिसून येतात.त्यातच डॉ.बाबासाहेबांनी संविधान दिले,संविधानावर अख्खे देश सुरू आहे.तत्पूर्वी या देशातील धर्म मार्तडांनी हीन, दीन,दलितांचे माणूसपण नाकारले होते.तेव्हा, बाबासाहेबांनी या देशात धम्मक्रांती केली.अथांग ज्ञानाचा हा महासागर कारुण्यरूपी तथागत बुद्धाच्या चरणी विसावला.या क्रांतीने कोटी-कोटी लोकांच्या जीवनाची दिशाच बदलली.हा समाज आता प्रगतीच्या,प्रकाशाच्या वाटेवर वाटचाल करू लागला आहे.आकाशाला गवसणी घालण्याचे बळ भीमाने दिल्याने मुखी ‘जय भीम’ चा जोश,तथागताच्या करुणामय प्रेरणेचा उत्साह,हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांच्या थव्यांनी गुरुवारी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले.६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरची दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली.दोन दिवसांपूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायांचे आगमन सुरू झाले होते.हातात शिदोरी, डोक्यावर गाठोडे घेऊन रेल्वे स्थानक,बस स्टॅण्डवरून जत्थेच्या जत्थे दीक्षाभूमीकडे मार्गक्रमण करीत होते.एकच ध्यास,बाबासाहेबांची आस मनात ठेवून दीक्षाभूमीला वंदन करून तथागत व बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी प्रत्येकजण आतूर होता. शहरातील सीताबर्डी,अजनी,धंतोली,रामदासपेठ,रहाटे कॉलनी या भागातून अनुयायांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावर दिसून पडत होते.येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या होत्या. रस्त्यावर ठिकठिकाणी भोजनदान,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,मार्ग दाखविण्यासाठी सूचना फलक, थकलेल्यांना निवारा मिळावा म्हणून उभारलेले पेंडॉल, रात्रीच्या निवाऱ्याची सोय प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी केली होती.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.वॉच टॉवर आणि पोलिस बलही जागोजागी तैनात केले होते.वाहतुकीच्या दृष्टिकोनातून दीक्षाभूमी परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. अश्यातच गुरुवारी दीक्षाभूमी परिसरात निळ्या पाखरांच्या मुखातून गुंजला तो ‘भीम बा’ चा नारा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!