Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोली'मी फिरून येतो'; असे पत्नीला सांगून गेला तो परतलाच नाही; मिळाला तो...

‘मी फिरून येतो’; असे पत्नीला सांगून गेला तो परतलाच नाही; मिळाला तो शरीराचा सांगाळा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पत्नी व मुलांसोबत बँकेतून पैसे काढले.काढलेल्या पैस्यातून संपूर्ण रक्कम पत्नीकडे दिली व त्यातून पाचशे रुपये रुपये स्वतःकडे ठेवून ‘मी फिरून येतो’,असे सांगून गेला तो परतलाच नाही. कुटूंबीय तसेच नातलगांनी इतरत्र सर्वत्र शोधाशोध केली.मात्र,कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अश्यातच तब्बल चोवीस दिवसांनी आढळला तो शरीराचा सांगाळा.४३ वर्षीय विजय कस्तुरे रा.येरकड, ता.धानोरा असे मृतकाचे नाव असून तो मागील महिन्याच्या १८ जून २०२५ पासून बेपत्ता होता.विजय कस्तुरे हा मिळेल ते काम व मजुरी करून संसाराचा गाडा हाकत होता.मृत विजय कस्तुरे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.घरचा आधारवड गेल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.त्यातच तब्बल चोवीस दिवसांनी त्याचा चवेला गाव परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सांगाळा आढळून आल्याने हत्या की आत्महत्या? अश्या चर्चांना आता ऊत आले आहे.सदरची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.गुरे राखणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने प्रकरणास वाचा फुटली.प्रकरणाचा पुढील तपास धानोरा पोलीस प्रशासन करीत आहे.हत्या की आत्महत्या हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!