Sunday, August 16, 2026
Homeगोंदियामाजी शिक्षणाधिकारी म्हणतात; 'त्या' स्वाक्षऱ्या मी केल्याच नाहीत..! - बोगस शिक्षक भरती...

माजी शिक्षणाधिकारी म्हणतात; ‘त्या’ स्वाक्षऱ्या मी केल्याच नाहीत..! – बोगस शिक्षक भरती प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-नागपूर जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरण आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गाजू लागले आहे.शिक्षक भरतीत बोगस शालार्थ आयडी काढून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचारी,अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. गोपनीय पद्धतीने होत असलेल्या चौकशीत एका माजी शिक्षण अधिकाऱ्याने ‘त्या’ स्वाक्षऱ्या मी केल्याच नाहीत,असा दावा केल्याने चौकशीची व्याप्ती वाढली असून आता शिक्षण विभागात अंतर्गत धुसफूस सुरू झाली.चौकशी पथकाने चौकशी देखील केली.मात्र त्यात काय तथ्य समोर आले,हे मात्र अद्याप कळू शकले नाही.बोगस शालार्थ आयडी काढून फसवणूक केल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली.मात्र या प्रकरणाची व्याप्ती गोंदिया जिल्ह्यात देखील पसरली आहे काय? याचा सुगावा घेणे आता सुरू झाले आहे.त्यासाठी चौकशी पथक देखील गोंदियात दाखल झाले होते.या प्रकरणात संस्था चालक आणि शिक्षण अधिकारी अशी साखळी कार्यरत असल्याने चौकशीत राजकीय दबाव तंत्रही वापरले जाते आहे.जिल्ह्यातील प्रकार देखील समोर येणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच काही आजी- माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याचे समजते.मात्र,त्यात काय नोंदविण्यात आले हे गुलदस्त्यात आहे.शिक्षक कर्मचाऱ्यांची चूक नसतांना त्यांची फसवणूक होत आहे.कर्मचाऱ्यांना व शिक्षण विभागातील काही प्रामाणिक अधिकारी व संस्था चालकांना फसविण्यासाठी बनावट स्वाक्षरीची कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांना फसविण्यात आले आहे,असे स्पष्टीकरण संघटनांकडून देण्यात येत आहे.मात्र हे प्रकरण गोंदियात देखील रोवले गेले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!