Thursday, September 3, 2026
Homeनागपूरमहिला आर्थिक विकास महामंडळात २२७ पैकी १७४ शिलाई मशीनचा घोटाळा उघड..

महिला आर्थिक विकास महामंडळात २२७ पैकी १७४ शिलाई मशीनचा घोटाळा उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मावीम म्हणजेच महिला आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार झाल्याने खळबळ उडाली आहे.महिलांना प्रशिक्षण देण्याच्या आणि मशीन पुरवण्याच्या नावाखाली जवळपास ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात पुण्यातील एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवेदिता अमोल नाहर, (अग्रवाल गोडाऊन,शिवडी इंडस्ट्रियल इस्टेट,पुणे) आणि उमेश रॉय जाधव (इचलकरंजी)अशी आरोपींची नावे आहेत.महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे.महामंडळातर्फे महिलांना वस्त्र व्यवसायाबाबत माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते.महामंडळाचे केंद्र कोराडी येथील जगदंबा मंदिर परिसराजवळ नियोजनानुसार गारमेंट सेंटरमध्ये २०० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार होते. शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण देण्याचे काम पुण्यातील सोशल बफरची संचालिका निवेदिता नाहरला देण्यात आले होते.त्यासाठी शासनाने २२७ मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या.संबंधित साहित्य इचलकरंजी येथील वरद एंटरप्रायझेसकडून घेण्याचे निश्चित झाले होते.२९ फेब्रुवारी २०२९ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत निवेदिता हिने वरद एन्टरप्रायझेसचा मालक उमेश रॉय जाधवशी संगनमत करून २२७ पैकी १७४ मशीनची अफरातफर केली. त्यांची किंमत जवळपास ८७ लाख ८५ हजार इतकी होती.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता आरोपींनी अफरातफर केल्याची बाब समोर आली.त्यानुसार कोराडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!