Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजमहाराष्ट्रातील कोंढाळा गावात महिला राज…..-ज्यामध्ये सरपंच महिला,पोलीस पाटील महिला,तलाठी महिला, वनरक्षक महिला...

महाराष्ट्रातील कोंढाळा गावात महिला राज…..-ज्यामध्ये सरपंच महिला,पोलीस पाटील महिला,तलाठी महिला, वनरक्षक महिला अन् इतरही पदाधिकारी महिलाच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- पूर्वी जिकडे बघावे तिकडे पुरुष प्रधान प्रणाली दिसून यायची; मात्र हल्ली काळानुरूप परिस्थिती बदलत चालली आहे.अशातच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जरी बघितले तरी असे गाव सापडणार नसल्याचे हल्ली दिसून येत आहे. केवळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोडले तर गावात प्रथम नागरिक म्हटल्या जाणाऱ्या सरपंचा महिला सोबतच पोलीस पाटील,ग्रामसेविका,तलाठी तसेच वनरक्षक महिला असून याच्यात आणखी चार ग्रामपंचायत सदस्य महिलांचा भर पडून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात जणूकाही महिला राज निर्माण झाले की काय? असे दिसून येत आहे.

सध्याच्या घडीला ‘साहेब’ म्हणण्यापेक्षा कित्तेक क्षेत्रात ‘मॅडम’ म्हणण्याचा ट्रेण्ड(कल) वाढलेला दिसून येतो आहे.महिला सशक्तीकरण करणे ही काळाची गरज जरी बनली असली तरीही आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानाच्या युगात महिला राज कित्तेक क्षेत्रात निर्माण झालेले दिसून येत आहे.याचेच साधे उदाहरण गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावातील आहे.पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला- खांदा लावून जरी महिला वर्ग धजावित असल्या तरीही ही केवळ बतावणी केली जात असल्याने घरातील अनेक पुरुष मंडळी महिला सशक्तीकरण यांच्या आळ येतांना दिसून येत आहेत.काही गावांमध्ये सरपंच महिला जरी बनल्या असतील तरीही अनेकांचे प्रतिनिधित्व नवरोबा करतांना दिसून येतात.महत्वाचे म्हणजे ज्यांना काही कळत नाही; अशांना कां बर? तुम्ही प्रतिनिधित्व तसेच उमेदवार ठरविता?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.अशांना धडा  शिकविणार कोण? असे विचार अनेकांच्या मनात घर सोडून जात आहे.अशातच एक ना धड भाराभर चिंध्या होतांना दिसून येत आहे. महिला सशक्तीकरण ही केवळ बतावणी शासनाकडून केली जात नाही.तर यासाठी महिला वार्गांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेकांच्या नाकावर लिंबू पिळून स्वतःच्या भुवया उंचावणे गरजेचे आहे.अन्यथा चूल आणि मूल या पलीकडे कुणीही जाणार नसल्याचे सुर निघू लागले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!