Sunday, May 31, 2026
Homeगोंदियामला आलेल्या समितीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे द्यावयाचे आहेत; पूर्ण पैसे घेवून याल तेव्हाच...

मला आलेल्या समितीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे द्यावयाचे आहेत; पूर्ण पैसे घेवून याल तेव्हाच फाईलवर स्वाक्षरी होईल.. – ५ हजार रुपयांचे पाकीट हातात येताच,नाराज झालेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाकीट दिले फेकून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-जिकडे बघावे तिकडे पैश्याशिवाय कामच होत नाही.भ्रष्टाचाराने सर्वत्र कळस घातलेले दिसून येतो.अश्याच प्रकारे चक्क गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा तपासणीचे नाव करून शाळेचा योग्य अहवाल देणार असल्याची बतावणी करून त्या बदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केली.चर्चेअंती २० हजार रुपये ठरले.मात्र,५ हजार रुपयांचे पाकीट हातात येताच,नाराज झालेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाकीट फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.प्रकरणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर असतांना प्रसार माध्यमांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले असता,त्यावर प्रतिक्रिया देत व्हिडिओतील सत्यता पडताळून कारवाई केली जाईल,असे स्पष्ट केले.याबाबत अधिक माहिती अशी की,गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केवळराम विद्यालय परसटोला येथील शाळेच्या तपासणीसाठी गेलेल्या गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा तपासणी करून सकारात्मक अहवालाच्या बदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते.अश्यातच पहिला पाकीट ५ हजार रुपयांचा देण्यात आला.त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पाकीट फेकून दिला.प्रकरणी व्हिडिओ तयार करून व्हायरल झाल्याने प्रकरणास वाचा फुटली.

  • राजू मेश्राम,संस्था प्रतिनिधी,केवळराम विद्यालय परसटोला👇

गटशिक्षणाधिकारी यांनी तपासणीसाठी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती.चर्चेनंतर ही रक्कम २० हजारांवर आली.त्यानंतर ५ हजार रुपये त्यांना देण्यात आले.मात्र उर्वरित रक्कम दिली नाही म्हणून गटशिक्षणाधिकारी यांनी पैशांचे पाकीट खाली आपटले.मला आलेल्या समितीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे द्यावयाचे आहेत,असे सांगितले.पूर्ण पैसे घेवून याल तेव्हाच फाईलवर स्वाक्षरी होईल,असे गटशिक्षणाधिकारी मला म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!