Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट शहर पोलीस ठाणे गाठल्याने पोलीसही अवाक् झालेत.सदरची घटना ही सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहरात घडली असून पूजा योगेश खुर्दामळे वय २६ वर्षे,हल्ली रा.शंभूराजे चौक,अलिपूर रोड,बार्शी,जि.सोलापूर(मूळ रा.शिराढोण,ता.कंधार, जि.नांदेड)असे आरोपी महिलेचे नाव आहे.तर शक्ती योगेश खुर्दामळे वय १० वर्षे,असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.धक्कादायक बाब म्हणजे,मोठी मुलगी तेजल वय ६ वर्षे ही सुदैवाने बचावली.पूजा खुर्दामळे हिने सकाळी घरी असतांना लहान मुलगी शक्ती हिचा गळा दाबून खून केला.ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने चिमुकलीला बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत बुडविले. त्यानंतर तिने घरातील तेजल हिचाही उशीने तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र, “आई,मी शाळा शिकते,मला मारु नकोस,” अशी विनवणी केल्यानंतर तिच्या तोंडावरील उशी बाजूला काढल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पंचनामा, पुरावे संकलन व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता(बीएनएस)कलम १०३(१) आणि १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास एपीआय सुनील धनवे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!