Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने शासन आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ मधील तरतूदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने,भारतीय वन सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना करण्यात येत असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार, चंद्रपूर,यवतमाळ,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर व चिखलदरा वनवृत्तास नव्याने पाच सहाय्यक वनसंरक्षक(एसीएफ)मिळाले आहेत.
१. प्रांजल प्रमोद चोपडे,सवसं(अधिसंख्य पद)उपवसं (प्रा.),अमरावती,अमरावती वनवृत्त यांची सहाय्यक वनसंरक्षक(तांत्रिक),चंद्रपूर वनवृत्त,चंद्रपूर येथे पदस्थापना.
२. इंगिलाला मुरलि क्रिष्णा,सवसं (अधिसंख्य पद)- उपवसं (प्रा.),गडचिरोली,गडचिरोली वनवृत्त यांची
सहाय्यक वनसंरक्षक(जंकास),यवतमाळ वन विभाग, यवतमाळ येथे पदस्थापना.
३. राहुलगौडा आर.,सवसं (अधिसंख्य पद) उपवसं (प्रा.),आलापल्ली,गडचिरोली वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक(सांख्यिकी),कोल्हापूर वनवृत्त,कोल्हापूर येथे पदस्थापना.
४. लोकेश मनोहर पाटील,सवसं (अधिसंख्य पद)- उपवसं (प्रा.),जुन्नर,पुणे वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक (वन्यजीव),वन्यजीव विभाग,छत्रपती संभाजीनगर.
५. भारथ प्रदीव डी,सवसं (अधिसंख्य पद)उपवसं (प्रा.),पश्चिम नाशिक,नाशिक वनवृत्त यांची सहायक वनसंरक्षक(तांत्रिक),गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा येथे पदस्थापना करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!