Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभरपाईसाठी चक्क जील्ह्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवरही जप्तीची कारवाई..

भरपाईसाठी चक्क जील्ह्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवरही जप्तीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्र किनारी असलेल्या रत्नसागर हॉटेल संदर्भात ९ कोटी २५ लाख रुपयांच्या भरपाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची तसेच केबीनमधील साहित्याच्या जप्तीला जिल्हा न्यायालयाने काल बुधवारी पुन्हा एकदा स्थगिती दिली.आता यावरील पुढील सुनावणी ११ जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?👇
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरील भाट्ये रत्नसागर हॉटेलसंदर्भातील वाद निर्माण झाला आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी येथील जागेचा ३० वर्षांसाठी करार केला होता. त्या नंतर एमटीडीसीने रत्नसागर हॉटेलच्या संचालकांना २००८ मध्ये दहा वर्षांच्या करारावर जागा भाडेपट्ट्याने दिली होती. ही मुदत २०१८ मध्ये संपली होती. शासन आणि एमटीडीसीमधील करार २०२० मध्ये संपला.याच जागेसंदर्भात एमटीडीसीने शासनाकडे जागेच्या कराराची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु त्यावर निर्णय झाला नव्हता. त्यामुळे १६ डिसेंबर २०२० मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नसागर रिसॉर्टच्या गेटला टाळे ठोकत जागा ताब्यात घेतली होती.या संदर्भात रत्नसागर रिसॉर्टच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर न्यायालयाने लवाद नेमला होता.या लवादामध्ये यावर खटला चालला रत्नसागरच्या संचालकांनी दाखल केलेल्या मागणीनुसार त्यांना लवादाने ७ कोटी ५ लाखांची नुकसान भरपाई,२ कोटी व्याज व अन्य इतर उत्पन्न बुडाले म्हणून २० लाख असे ९ कोटी २५ लाख देण्याचे आदेश दिले होते.शुक्रवार ४ एप्रिल रोजी न्यायालयाचे बेलीफ आणि रिसॉर्टचे संचालक हे जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाईसाठी दाखल झाले होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची,संगणक व साहित्य जप्त करण्यासाठी पंचयादीही घालण्यात आली.कारवाई सुरु असतांनाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या-वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी न्यायालयात जात जिल्हा न्यायालयाकडे या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता.यावर सरकारी वकील ॲड.अनिरुध्द फणसेकर यांनी जिल्हा न्यायालयात महसूल विभागाची बाजू मांडली.त्यानंतर जिल्हा न्यायालयाने जप्तीच्या कारवाईला काल,बुधवार १६ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. काल बुधवारी या स्थगितीची मुदत संपल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई न्यायालयात उपस्थित होते.त्यानुसार आता यावरील पुढील सुनावणी ११ जून २०२५ रोजी होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!