- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वर्ध्याहून नागपूरकडे येतांना कार चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली.रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला आणि भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून सुमारे २० फूट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर मृत्यू पावलेल्या तरुणाची बहिण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवारी १४ मार्चला नागपूर जिल्ह्याच्या बूटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडली.अरिंजय अभिजित श्रावणे वय १८ वर्षे याचा जागीच मृत्यू झाला,तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे ही गंभीर जखमी झाली असून इतर जखमींना नागपूरच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचा चेंदामेंदा झाला.
नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहाणारे सक्षम बाफना,हिमांशू बाफना आणि मानस बदानी हे तिघे होळी निमित्त वर्धा येथे गेले होते.परत येतांना त्यांनी अजिंक्य आणि त्याची बहीण अक्षता यांना वर्धेतून सोबत घेतले.अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते.नागपूरकडे येतांना,चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे बूटीबोरी पोलिसांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

