- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-घरून बेपत्ता झालेल्या एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.मयूर वसंतराव खरवडे वय ३५ वर्षे,रा.गांधीनगर वॉर्ड ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयूर खरवडे हे बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावात होते.शनिवारी ६ सप्टेंबरला घरून अचानकपणे निघून गेल्याने कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.त्यानुसार पोलिसांनी सर्वप्रथम मयूर खरवडे यांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला असता मोबाइल फोन हा ब्रम्हपुरी नजिक असलेल्या खेड गावाजवळील गोसेखुर्द कालव्याच्या(मोठा नहर) परिसरात सापडला.मात्र,मयूर खरवडे यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.त्यामुळे त्याने कालव्यात उडी घेतली असावी,अशी पोलिसांना शंका आली आणि त्या दिशेने तपास सुरू करून शोधमोहीम तीव्र केली. शनिवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली.रात्र होऊनही मयूर कुठेही सापडलेला नव्हता.अश्यातच काल रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सावली तालुक्याच्या पात्री गावाजवळील गोसेखुर्द कालव्याच्या पाण्यात मयूर खरवडे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला.त्यानुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

