- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ उत्तरदायी शासन कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण गडचिरोली येथे संपन्न झाले.
४ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा,गडचिरोली येथे झालेल्या तीन दिवसीय District Process Lab (DPL) प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविशांत पंडा,मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रणजीत यादव,कुशल जैन यांनी केले.
धरती आबा अभियानाची सुरुवात २ ऑक्टोंबर २०२४ रोजी हजारीबाग(झारखंड)येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले.तर महाराष्ट्रात या अभियानाच्या प्रचार-प्रसार उपक्रमाचे उद्घाटन १६ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते झाले. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३२ जिल्हे,२१४ तालुके व ४ हजार ९७५ गावे निवडण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुके व ४११ गावे या उपक्रमात समाविष्ट असून २ लाख ८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभ शंभर टक्के पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचा आराखडा आखला असून,त्यात शिक्षण, आरोग्य,महिला व बालविकास,ग्रामीण विकास, पाणीपुरवठा,पंचायत,वन,कृषी,पशुसंवर्धन,सहकार, सार्वजनिक बांधकाम,विद्युत वितरण व आदिवासी विकास विभाग यांचा समावेश आहे.स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग यात आहे.प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मास्टर ट्रेनर्स नितीन पाटील,योगेश वैद्य,रवी आत्राम, विक्रम सटाले,गजानन भांडेकर,प्रवीण पाटील,अखिल श्रीरामवार व माधव मडावी यांनी मोलाची भूमिका बजावली.या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात बहुस्तरीय क्षमता विकास घडवून आणत उत्तरदायी शासन व्यवस्था उभारण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
- Advertisement -

