Sunday, April 19, 2026
Homeनागपूरक्राइम पेट्रोल मालिका पाहून झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न फसला.. - २८ वर्षीय...

क्राइम पेट्रोल मालिका पाहून झटपट पैसे कमावण्याचा प्रयत्न फसला.. – २८ वर्षीय महिलेला तीन तासांतच बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दररोज क्राइम पेट्रोल मालिका पाहून त्यातील काही कथानक अंगात संचारले आणि आपणही शॉर्ट कट मार्गाने झटपट पैसे कमावण्याची कृती करणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा प्रयत्न फसला.प्रकरणी नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी तीन तासांत आरोपी महिलेचा छडा लावून तिला गजाआड केले.२८ वर्षीय सपना भोजराज जामुनपाने ऊर्फ सपना मयूर मेंढे रा.शिवणगाव पुनर्वसन, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी महिला ही टीव्हीवर सतत क्राइम पेट्रोल पहायची.क्राइम पेट्रोल मालिकेत चोरी करण्यासंदर्भाने कथानक नजरेसमोर ठेवून तिने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरविले.त्यानुसार ६५ वर्षीय सुमन कृष्णाजी जरोंडे  रा.शिवनगाव पुनर्वसन,नागपूर या आपल्या घरासमोर रस्त्यावर फिरत होत्या.तेवढ्यात आरोपी सपना तोंडाला स्कार्फ बांधून त्यांच्याजवळ गेली आणि तिने सुमन यांच्या गळ्याला चाकून लावून गळ्यातील मंगळसूत्र काढून देण्यास सांगितले.घाबरलेल्या सुमन यांनी मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला,परंतु ते निघाले नसल्याने आरोपी सपनाने मंगळसूत्र हिसकावून तोडले.त्यानंतर सपना घटनास्थळावरून फरार झाली.घाबरलेल्या सुमन यांनी सायंकाळी मुलगा घरी आल्यानंतर आपबीती सांगितली.शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार दिली.परंतु,आरोपी तोंडाला स्कार्फ बांधून असल्यामुळे तिचे वर्णनही सुमन यांना सांगता येत नव्हते.त्यामुळे बेलतरोडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कांडुरे,उपनिरीक्षक शिरीष सलगर,रविकांत भदाने,सुकन्या चौधरी,सुनील ढोके यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली.एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत आरोपी महिला आढळली.त्या फुटेजच्या आधारे शोध घेतल्यानंतर आरोपी सपनाला अटक करण्यात आली व तिची तब्बल सहा तास चौकशी केली.चौकशी करूनही ती मी नव्हे,अशी भूमिका घेतली.पोलिसी खाक्या बसताच आरोपी सपनाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली व टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका पाहून झटपट पैसे कमावण्यासाठी सदरची कृती  केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!