Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीबेपत्ता पतीचाही आढळून आला मृतदेह...

बेपत्ता पतीचाही आढळून आला मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-एटापल्ली तालुक्यातील करपनफुंडी गावातील वृद्ध महिलेचा मृतदेह नदीत आढळला होता.यानंतर आता आज,बुधवारी २८ ऑगस्टला काही अंतरावर तिच्या पतीचाही मृतदेह आढळून आला आहे.मालमत्तेच्या वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून,पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.रैनू जंगली गोटा वय६० वर्षे आणि बुर्गो रैनू गोटा वय ५५ वर्षे असे मृत दांपत्याचे नाव आहे.

करपनफुंडी गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जांभिया आणि बांडे या दोन नद्यांच्या संगमानजीकच्या शेतावर असलेल्या झोपडीत ते राहत होते.परंतु शनिवारपासून दोघेही बेपत्ता होते.काल,मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नदीत बुर्गो गोटा या महिलेचा मृतदेह आढळला.त्यानंतर आज,बुधवारी काही अंतरावर रैनू गोटा याचाही मृतदेह आढळून आला.सुरुवातीला गोटा यांच्या नातेवाईकांनी जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होता.परंतु पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्यास सुरुवात केली.त्यानंतर पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते.परंतु जादुटोण्याचा प्रकार असल्यास त्याही बाजूने पोलिस तपास करतील,असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!