Thursday, September 3, 2026
Homeनागपूरबालसुधारगृहातून पळालेला बालक आढळला छत्तीसगडमध्ये..

बालसुधारगृहातून पळालेला बालक आढळला छत्तीसगडमध्ये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तब्बल दीड वर्षापूर्वी बालसुधारगृहातून पळालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाचा शोध घेण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकास यश आले आहे.बालसुधारगृहातून पळालेला एक बालक छत्तीसगडमध्ये सापडला असून त्याचे समुपदेशन करून त्याला कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.नागपूरच्या पाटणकर चौक,कपिलनगर येथील बालसुधारगृहातून दीड वर्षापूर्वी दोन अल्पवयीन मुले पळाली होती.त्यानुसार,कपिलनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.बऱ्याच कालावधीपासून दोन्ही अल्पवयीन मुलांचे शोध घेणे सुरू होते.अश्यातच तांत्रिक तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकास एक मुलगा छत्तीसगडच्या खैरागड येथे असल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकाने खैरागड येथे पोहचून त्याचा शोध घेतला असता तो सापडला.नंतर त्याला नागपुरात आणून त्याचे समुपदेशन करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!