Thursday, July 30, 2026
Homeगडचिरोलीबालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष ॲक्शन प्लॅन..

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष ॲक्शन प्लॅन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून आज,बुधवार ३० एप्रिलला अक्षयतृतीया उत्सव साजरा करण्यात येत आहे.या शुभ दिवशी विवाह विधी मोठ्या प्रमाणात होतात.त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे. अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पार पडणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार यंदा बालविवाहाच्या घटनांवर थेट कठोर कारवाई करण्यात येणार आहे.बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष ॲक्शन प्लॅन तयार केला असून, ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांना तर शहरी भागात बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.बालविवाहात सहभागी होणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या धार्मिक गुरू,पंडित,मंडप मालक,छायाचित्रकार,केटरिंग व्यावसायिक,लॉन मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ अथवा ११२ वर संपर्क साधावा.दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
बालविवाह प्रतिबंध👇
गडचिरोली जिल्ह्यात मागील सहा वर्षांत १७ बालविवाह थांबविण्यात आले असून,राज्यात एकूण ५ हजार ४२१ बालविवाह रोखण्यात आले आहेत. यापैकी ४०१ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!