Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबसमुळे लग्नाला उशीर; ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव.. - एसटी महामंडळाच्या दोन...

बसमुळे लग्नाला उशीर; ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव.. – एसटी महामंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजही अनेकांना ग्राहक तक्रार निवारण आयोग वा मंच काय असते,हे माहीतच नाही. त्यामुळे अनेकांच्या बाबतीत घडलेले विविध प्रसंग नशिबाला दोष देण्यात निघून जातात.मात्र,काहीजण नशिबाला दोष न देता प्रत्यक्षात कृती करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील तरुणाने ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत नांदगावचे आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रकास अद्दल घडवली आहे.प्रकरणी मंचाने एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येथील सतीश बिडवे यांच्या मुलाचा २३ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे विवाह होता.एसटी बसच्या प्रासंगिक करारासाठी १५ फेब्रुवारी रोजी रोखपाल कारकुनी यांच्याकडे २२ हजार रुपये जमा केले होते.आगार व्यवस्थापक व नियंत्रकाने बसचालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस पत्त्यावर न जाता नांदगावहून नस्तनपूरला गेल्याने उशिरा पोहोचली.बस आल्यानंतर ५० किलोमिटर अंतरावर ती बंद पडली.निवारा नसल्याने वऱ्हाडी मंडळीचे हाल झाले. तक्रारदाराने विभाग नियंत्रकाशी संपर्क साधला असता, ‘अर्ध्या तासात बस उपलब्ध करून देतो,’ असे सांगितले. मात्र,बस सुमारे अडीच तास उशिरा आली.यामुळे वऱ्हाडाचे हाल झाले.रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. बस लग्नस्थळी तीन तास उशिरा पोहोचल्याने लग्नाला उशीर झाला.त्यामुळे वधू पक्षाकडील मंडळीही नाराज झाली.शारीरीक,मानसिक त्रास झाल्याने तक्रारदाराने ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,यासाठी ग्राहक मंचात तक्रार केली होती. ‘बस मुद्दामहून बंद पडली नाही.दुसरी बस वेळेत आली’ असा युक्तिवाद एसटी महामंडळातर्फे करण्यात आला.ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्ष मंदाकिनी भोसले,सदस्य कविता चव्हाण यांनी तक्रारदार आणि एस.टी.महामंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.बस बंद पडल्याने तक्रारदार आणि वऱ्हाडाला त्रास सहन करावा लागला.मात्र,बस प्रवास ठरल्याप्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा निष्कर्ष देत एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक मंचाने दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!