Thursday, September 3, 2026
Homeनागपूरबनावट शिक्का तर बनवला; पण जुनेच पद टाकल्याने बिंग फुटले..! - बांधकाम...

बनावट शिक्का तर बनवला; पण जुनेच पद टाकल्याने बिंग फुटले..! – बांधकाम कामगार लाभार्थ्यांचा प्रताप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बांधकाम कामगारांना बांधकामाशी संबंधित सुरक्षा उपकरणे,घरगुती वस्तू,अपघात झाल्यास मोफत उपचार,विमा तसेच मुलांना शिक्षण आणि इतर सुविधांमध्ये कामगार विभागाकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली असल्याने जे कामावर जात नाही,असेही योजनेचा लाभ घेऊ लागलेत. त्यातच काही दलाल पैसे घेऊन कामगारांची बनावट कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्याचे काम करतांना दिसून येतात. अश्यातच नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.गंमत म्हणजे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सही, शिक्का मारत नाही म्हणून चक्क ‘सचिव ग्रामपंचायत’ नावाचा बनावट शिक्का बनवला आणि अर्जावर खोटी सही मारली. मात्र,मागील वर्षात २४ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करीत करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असे करण्यात आलेले असून बनविलेल्या शिक्क्यावर जुनेच पद टाकल्याने प्रकरणास वाचा फुटली.सदरची घटना उमरेड तालुक्याच्या आपतूर गावातील असून आतापर्यंत एकूण आठ लाभार्थ्यांच्या अर्जावर असे करण्यात आले असल्याने प्रकरणी कुही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘सचिव ग्रामपंचायत आपतूर पं.स.उमरेड जि.प.नागपूर’ या नावाने आठ बांधकाम लाभार्थ्यांच्या अर्जावर खोटा शिक्का व सही मारण्यात आली आहे.प्रकरणी आपतूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजेश्वर लडके यांनी लाभार्थ्यांच्या अर्जाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, ‘ग्रामपंचायत अधिकारी’ हे पद मागील वर्षातच झाले.मात्र,शिक्का व सही १४ एप्रिल ते २८ जुलै २०२५ दरम्यानचे असल्याने बिंग फुटले.
  • राजेश्वर लडके,ग्रामपंचायत अधिकारी, आपतूर👇

माझ्या नावाचा शिक्का आणि स्वाक्षरी ही खोटी आहे. इमारत आणि इतर बांधकाम अर्जावर त्याचा गैरवापर केला गेला,असे निदर्शनास येताच मी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.याशिवाय,आठ अर्जावरील नावातही तफावत आहे.अर्जावर नोंदविण्यात आलेले जावक क्रमांकही खोटे असून याबाबत आपतूर ग्रामपंचायतीच्या जावक रजिस्टरमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!