Tuesday, July 7, 2026
Homeचंद्रपूरबनावट ग्राहकाने 'ओके' असा मॅसेज टाईप करताच देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..

बनावट ग्राहकाने ‘ओके’ असा मॅसेज टाईप करताच देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरातील फाशी चौक परिसरात चालवल्या जाणाऱ्या एका देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली,तर देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीवर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण अनिल भोयर वय ३६ वर्षे व त्याची ३४ वर्षीय पत्नी,रा.फाशी चौक,ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल व इतर साहित्य मिळून सुमारे  २३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ब्रम्हपुरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल गुरुवारच्या सायंकाळी शहरातील फाशी चौक परिसरात सापळा रचण्यात आला.दरम्यान,पंच म्हणून दोन समाजसेविका महिलांना पाचारण करण्यात आले.त्यानंतर,एका बनावट ग्राहकास भोयर यांच्या घरी पाठवण्यात आले.ग्राहकाने काही वेळातच पाळत ठेवणाऱ्या पोलीस पथकास व्हॉट्सॲपवर ‘ओके’ असा मॅसेज टाईप करुन पाठवताच पोलिसांनी अड्ड्यावर छापा टाकला.छाप्यात उपस्थित महिला पोलीस कर्मचारी यांनी घेतलेल्या अंगझडतीत महिलेकडून पोलिसांनी बनावट ग्राहकाने दिलेल्या चिन्हांकित नोटा आणि १० हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला.तसेच,खोलीतून इतर रोख रक्कम,रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि आक्षेपार्ह साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस तपासात, देहव्यापाराचा अड्डा प्रवीण भोयर व त्याची पत्नी हे दोघेही मिळून चालवायचे.पीडित महिलेस अर्धी रक्कम व स्वतः करीता अर्धी रक्कम ठेवायचे.देहव्यापारासाठी भोयर दाम्पत्य स्वतःच्या घराचा वापर करीत होते.हे विशेष.सदरची छापा कारवाई ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले,एपीआय मनोज खडसे, शितल खोब्रागडे,गुन्हे शाखा पथकातील कर्मचारी व ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!