Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबदलत्या वातावरणाचा तेंदुपत्ता कामगारांना फटका..!

बदलत्या वातावरणाचा तेंदुपत्ता कामगारांना फटका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तेंदूपत्ता संकलन हा सर्वसामान्य नागरिक,गोर-गरीब लोकांसाठी उदरनिर्वाह,शेतीसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदत करणारा व काही आर्थिक संकट दूर करणारा महत्त्वाचा रोजगार आहे.तेंदुपत्ता संकलन करणारे मजूर हे पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत उन्हा-तानाचे चटके घेत,जीव मुठीत घेऊन व जंगलातील हिंस्र पशुंपासून संरक्षण करीत या रानातून त्या रानात वन-वन फिरून तेंदूचा एक एक पत्ता तोडत आपल्या ओझ्याची भरती करून प्रत्येकजण चार पैशांसाठी जुळवाजुळव करतांना दिसून येतात.उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतकरी असो की कष्टकरी मजूर तेंदुपत्ता संकलनासाठी सज्ज होतात.दरवर्षी तेंदुपत्ता संकलनाला मिळणारा भाव आणि बोनस तेंदूपत्ता कामगारांचे काही प्रमाणात आर्थिक संकट दुर करून जाते.परंतु दरवर्षी बदलत्या वातावरणामुळे तेंदुपत्ता संकलन कमी होत असून,पंधरा दिवस चालणारा सीजन चार ते पाच दिवसांतच बंद पडू लागल्याने तेंदूपत्ता कामगारांवर आर्थिक अडचणी ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मजुरांच्या हाताला काम मिळायचा व दोन पैसे गोळा व्हायचे,तर अस्मानी संकट आणि बदलते वातावरण आता गोर-गरीबांचे रोजगार हिरावू लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!