Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीप्रचाराच्या तोफ थंडावणार; उद्याला दुपार नंतर जाहीर प्रचारास बंदी..

प्रचाराच्या तोफ थंडावणार; उद्याला दुपार नंतर जाहीर प्रचारास बंदी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड म्हणजे शांत वातावरण असणे गरजेचे आहे.मतदारसंघात ४८ तास आधी प्रचार करता येत नाही.तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही,असे आयोगाचे निर्देश आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी,गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या दिनांक-१८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजतानंतर जाहीर प्रचारास बंदी असणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे.मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. निवडणूक ओळखपत्राशिवाय (EPIC) कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत  जनजागृती करण्यात आली आहे.आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहन निवडणूक यंत्रणाने केले आहे.पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली असून मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!