- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ही घटना आज,बुधवार ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. निलेश पाटील हे पुण्याच्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास औंध येथील नगरस रस्त्यावरील सुवर्णयोग सोसायटी मधील आपल्या राहत्या घरात त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान,वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.निलेश पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले,हे अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

