Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीपेट्रोल पंपांवर सुविधांचा अभाव- ग्राहकांचे हक्क घेतले जातेय हिरावून; कारवाई शून्य

पेट्रोल पंपांवर सुविधांचा अभाव- ग्राहकांचे हक्क घेतले जातेय हिरावून; कारवाई शून्य

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरासह तालुका व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर अनेक सुविधांचा अभाव असून पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याने यांस जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह,आग प्रतिबंधक उपकरणे,वाहनांमध्ये हवा भरण्याची ग्राहकांसाठी सुविधा असणे अनिवार्य आहे.सदर सुविधा पेट्रोल पंपांवर न ठेवल्यास संबंधित पेट्रोल पंप धारकांवर कारवाई करण्यात येते.

पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही.मात्र हल्ली कित्तेक पेट्रोल पंपांवर पिण्याचे पाणी असते तर स्वच्छतागृह नाही,आग प्रतिबंधक उपकरणे असतात तर वाहनांमध्ये हवा भरण्याची मशिनच गायब असते. अशी कित्तेक पेट्रोल पंपांवर बिकट अवस्था हल्ली निर्माण झाली आहे.

पेट्रोल पंपावर गैरसोय असेल तर त्या पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे अधिकार तहसीलदार तसेच पोलिसांना असते; परंतु तपासणीच होत नाही आणि तपासणी होत असेल तर त्यात त्रुट्या दिसत नाही.पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे काम पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा व तहसीलदारांकडे असते; परंतु हे दोन्ही घटक या पेट्रोल पंपांकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यात वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार सुरू आहे.

तपासणी अधिकाऱ्यांना त्रुटी न दिसणे म्हणजे ‘डोळ्यात तिखट’ घालण्यासारखी अवस्था झाली की काय?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.तहसीलदारांच्या चौकशी अहवालावरून संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात.मात्र जिल्ह्यात सर्वत्र वेगळीच परिस्थिती पहावयास मिळते आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!