Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीपुर ओसरू लागला; पण अद्यापही १५ मार्ग बंद..

पुर ओसरू लागला; पण अद्यापही १५ मार्ग बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले होते.पावसामुळे घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.पक्के बांधकाम केलेली घरे पावसामुळे थबकु लागली होती.भिंती ओलेचिंब होऊन घरांमध्ये ओलावा निर्माण होऊ लागला होता.अश्यातच काल बुधवार ९ जुलैच्या दुपार पासून पावसाने जिल्ह्यात शांतता राखत काही प्रमाणात दिलासा दिल्याने पुर ओसरू लागला आहे.पण गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे अद्यापही १५ मार्ग बंद स्थितीत असून हळूहळू उद्या पर्यंत संपूर्ण मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.
  • सायंकाळी ६ वाजे,पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
१.गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी,कोलांडी नाला,गाढवी नदी)
२.गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला,शिवणी नाला)
३. आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (दिना नदी)
४. तळोधी आमगाव रेगडी देवदा रस्ता राज्यमार्ग ३८१ (पोहार नदी)
५. अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) तालुका अहेरी
६. हरनघाट चामोर्शी रस्ता राज्यमार्ग ३७० (दोडकुली, दहेगाव नाला)तालुका चामोर्शी
७. अहेरी देवलमारी व्यंकटरावपेठा मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग तालुका अहेरी (देवलमारी पुल, व्यंकटरावपेठा पूल)
८. चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
९. अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
१०. भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला,अनखोडा नाला)तालुका चामोर्शी
११. वडसा वळण मार्ग प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
१२. चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
१३. खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा ४४ तालुका गडचिरोली
१४. वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,५५ तालुका चामोर्शी
१५. वाघाळा सायगाव शिवणी रस्ता प्रजिमा ३४ तालुका आरमोरी
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!