- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही वर्षांपासून निसर्गाचे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे.कधी भर उन्हाळ्यातच पावसाळ्यासारखे वाटते,तर कधी भर पावसाळ्यातच घामाघूम झाल्यासारखे वाटत असते.अश्यातच पावसाळ्यातील शेवटच्या सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा परतीचा पाऊस आहे की काय?असे म्हणताच येणार नाही.नुकतेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,२३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम,तर काही भागांत मध्यम ते मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली असतांनाच आता काही वेळापूर्वीच मुंबईच्या मंत्रालय स्तरावरून नागरिकांना मोबाईलवर एक संदेश पाठविण्यात आला असून पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.संदेशात पुढील ३ तासात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी जोरदार पावसासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि वादळ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

