- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त शाळेत विविध शैक्षणिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे सामाजिक महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान शिक्षक शिवराम हाके आणि कुमारी अपेक्षा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा,त्याचा उपयोग आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहिती अधिकार विषयाची सखोल चर्चा घडवून आणली.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता निबंध लेखनातून त्यांनी माहिती अधिकाराबद्दलचे विचार मांडले,तर पोस्टर स्पर्धेतून सर्जनशील कलाकृतीद्वारे संदेश दिला.तर प्रश्नमंजुषा स्पर्धेतून त्यांनी ज्ञानाची उजळणी केली.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत जागरूकता,संवेदनशीलता आणि माहिती मिळविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी शाळेचे सहाय्यक शिक्षक शिवराम हाके, शिक्षिकाकु.अपेक्षा देशपांडे, मार्गदर्शक तथा सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानत कौतुक केले.
- Advertisement -

