Sunday, April 19, 2026
Homeब्रम्हपुरीपिके वाचविण्यासाठी झटका तार लावण्याच्या प्रयत्नात चौघांचा दुर्दैवी मृत्यू... - ब्रम्हपुरी तालुक्यातील...

पिके वाचविण्यासाठी झटका तार लावण्याच्या प्रयत्नात चौघांचा दुर्दैवी मृत्यू… – ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर
शिवारात पिके वाचविण्यासाठी झटका तार लावण्याच्या प्रयत्नात चौघांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची भीषण घटना काल,बुधवारी ११ सप्टेंबरच्या सकाळी ९ वाजता घडली.सदरच्या घटनेने गावकरी सुन्न झालेत. काल,दिवसभर मृतकांचे नातेवाईक व शेजारील गावांतील शेतकऱ्यांनी गणेशपुरात धाव घेतली.या धक्कादायक घटनेने अनेकांची चूलही पेटली नाही. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी केलेल्या धडपडीने चौघांचा जीव जाण्याची घटना घडेल,हे आमच्या स्वप्नातही आले नसते; अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ब्रम्हपुरीपासून २० किमी अंतरावर जंगलव्याप्त गणेशपूर येथील प्रकाश राऊत व त्याचे काका नानाजी राऊत सहकाऱ्यांसह शेतात खत टाकण्यासाठी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास गेले होते.खत टाकून झाल्यानंतर वन्य प्राण्यांपासून शेताचे रक्षण करण्यासाठी झटका तार लावण्याचे काम सुरू होते. यावेळी विजेचा धक्का बसल्याने पुंडलिक मानकर वय ६५ वर्षे, रा.चिचखेडा, प्रकाश खुशाल राऊत वय ४५ वर्षे,युवराज डोंगरे वय ४३ वर्षे,नानाजी पुंडलिक राऊत वय ५५ वर्षे सर्व रा.गणेशपूर या चौघांचा जागीच मृत्यू झाला.तर सचिन नन्नावरे वय ३५ वर्षे हा जखमी झाला असून,त्याच्यावर मेंडकी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच काल दिवसभर अनेकांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही.मृतकांचे नातेवाईक जड अंतःकरणाने गणेशपुरात दाखल झाले.सुमारास परिसरातील सर्वांनी शेतीची कामे बंद ठेवली होती.काहींनी चिखलातून वाट काढत घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली.वीज नेमकी कशी प्रवाहित झाली; हे स्पष्ट झाले नाही.पण पोलिस,वन विभाग, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर घटनास्थळाची पाहणी केली.
गणेशपूर शिवारालाच लागून चिचखेडा,मेंडकी, कळमगाव,सायगाव,पातळी ही गावे आहेत. गणेशपुरातील मृतकांचा या गावांतील शेतकऱ्यांशी चांगला संवाद होता.ही भीषण घटना घडल्याने महिला-पुरुषांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविल्यानंतर तिथेही गर्दी झाली. उपस्थित प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करीत होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!