Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाने दळी मारली; मुबलक जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका..

पावसाने दळी मारली; मुबलक जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी लगतच्या नागपूर, भंडारा,गोंदिया व वर्धा जिल्ह्यात अजूनही मान्सून दाखल झालेला नसल्याचा अंदाज हवामान खात्याने पुरविलेला आहे.त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा मान्सूनशी संबंध न जोडता मुबलक जमिनीत ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका,असे आवाहन वेळोवेळी कृषी विभागामार्फत केले जात आहे.ऐन भर उन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे.कधी नव्हे एवढा पाऊस मे महिन्यात अनुभवायला आला.उन्हाळी हंगाम मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे.शेतीची कामे प्रभावित ठरली आहेत.मात्र हवामान तज्ज्ञांनी आता पाऊस उघडीप घेणार असल्याचं अंदाज पुरविल्याने शेतीची कामे आटोपायला नक्कीच मदत होणार आहे.कोरडवाहू शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे,अशा शेतकऱ्यांनीही मान्सूनचा अंदाज घेऊनच पुढचे पाऊल टाकावे.याचे कारणही असेच आहे की,एप्रिल महिना खूपच तापला.त्यामुळे पाणी पातळीत मोठी घट अनुभवायला मिळाली.ती तूट भरून काढण्यासाठी निसर्गाचा अंदाज अर्थात मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!