Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीपशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन..अन्यथा पशुवैद्यकीय सेवा, नुकसानभरपाई कत्तल, वाहतूक,खरेदी व इतर...

पशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन..अन्यथा पशुवैद्यकीय सेवा, नुकसानभरपाई कत्तल, वाहतूक,खरेदी व इतर बाबी देय होणार नाहीत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाला ईअर टॅगिंग करणे व त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचे कार्य सातत्याने सुरु असून पशुपालकांनी त्यांच्या जनावरांना इयर टॅगिंग करून माहिती अद्यावत करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

दिनांक -१ जून २०२४ नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही.तसेच कत्तल खान्यामध्ये ईअर टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.नैसर्गीक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.तसेच कोणत्याही पशुधनाची वाहतुक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या,आठवडी बाजार व गावा- गावातील खरेदी विक्री व बैलगाडया शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणबाबतच्या नोंदी संबधीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करुन घेण्याची जबाबदारी संबधीत पशुपालकांची राहिल.ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाच्या दाखला देतांना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवु नये.दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमुद करण्यात यावा; असे आदेश जिल्हाधिकारी गडचिरोली संजय दैने यांनी पारित केलेले असून सर्व पशुपालकांनी वेळीच आपल्याकडील जनावरांना टॅगिंग करुन घेऊन गैरसोय टाळावी; असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!