Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोली२३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना  दहा वर्षे सश्रम कारावास…-कुरखेडा तालुक्यातील घटना;...

२३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना  दहा वर्षे सश्रम कारावास…-कुरखेडा तालुक्यातील घटना; सहा वर्षांनंतर लागला निकाल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षापूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती.या प्रकरणात काल, १७ मे २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास व पावणेतीन लाख रुपयांचा दंड,अशी शिक्षा सुनावली.

प्रशांत उत्तम जोगे वय ३२ वर्षे व रवींद्र सुमराज मडावी वय २५ वर्षे दोघेही रा.बेलगाव,ता. कुरखेडा, अशी आरोपींची नावे आहेत.पीडित २३ वर्षीय मुलगी सायकलवरून गावातून कुरखेडा येथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायची.३ मार्च २०१८ रोजी ती नित्याप्रमाणे सायकलवरून जात होती.वाटेत प्रशांत जोगे व रवींद्र मडावी यांनी दुचाकीवरून येऊन सायकलला धडक दिली.ती खाली कोसळताच दोघांनी तिला  जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्त्याने घेऊन गेले.  रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर जंगल परिसरात दुपारी १२ ते १२:३० वाजेदरम्यान तिच्यावर अतिप्रसंग केला.पीडितेने तीव्र विरोध केला तेव्हा रवींद्र मडावीने तिचे हातपाय पकडले व प्रशांत जोगे याने टोकदार वस्तूने तिला जखमी केले.नंतर तिच्याशी कुकर्म केले.७ मार्च २०१८ रोजी कुरखेडा ठाण्यात बलात्कार,विनयभंग,मारहाण आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर व उपनिरीक्षक विजय वनकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.विशेष जिल्हा व सत्र न्या.उत्तम एम. मुधोळकर यांनी साक्षीपुरावे व जिल्हा सरकारी वकील अनिल एस.प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व २ लाख ७४ रुपयांचा दंड ठोठावला.दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशात नमूद आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!