Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपरिस्थितीवर मात करीत सुरज चव्हाणने गाठले यशोशिखर... - बिग बॉस मराठीच्या ५...

परिस्थितीवर मात करीत सुरज चव्हाणने गाठले यशोशिखर… – बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वाचा ठरला मानकरी; सूरज चव्हाणला ट्राफीसह मिळाली ‘इतकी रक्कम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- बिग बॉस मराठीच्या ५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काल,६ ऑक्टोंबरच्या रात्री पार पडला.या पर्वातील १६ सदस्यांना मागे टाकत बारामतीच्या सूरजने आपल्या ‘झापुक झुपूक’ अंदाजात ट्रॉफीवर नाव कोरले.सूरज विजयी ठरल्याने गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.बिग बॉसच्या या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला ट्राफीसह १४ लाख ६० हजार रुपये रक्कम मिळाली, तसेच इतर अनेक बक्षीसांचा वर्षावही झाला आहे.
सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील आहे.बारामती तालुक्यातील मुडवे हे त्याचे गाव आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सूरजचे बालपण गेले. सूरज १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि ती आजारी पडली.या आजारपणातूनच पुढे सूरजच्या आईचेही निधन झाले.आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी,अशा या भावंडांनी एकमेकांना आधार दिला.आत्या व मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले.यानंतर हाताला मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवू लागला.हलाखीच्या स्थितीतून जात असतानाच,सूरजच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. भारतात तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू होता. सूरजनेही टिकटॉकवरून आपला ऑनलाईन प्रवास सुरू केला.टिकटॉकवरील रिल्सच्या माध्यमातून तो लोकांचे मनोरंजन करू लागला. टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर सूरज इन्स्टाग्रामकडे वळला. इन्स्टाग्रामवरुनही त्याने चाहत्यांचे मनोरंजन सुरू ठेवले.इन्स्टाग्रामवर आजच्या घडीला त्याचे तब्बल २ मिलियन फॉलोअर्स आहेत. ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘गुलीगत धोका’, ‘झापुक झुपूक’ अशा शब्दांमुळे तो नेटकऱ्यांत चांगचाल प्रसिद्ध झाला; यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली.बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजने आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले.पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता.अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कलाकारांशी त्याची स्पर्धा होती.त्यातच त्याला खेळ समजत नाही; अशी टीकाही त्याच्यावर सातत्याने होत राहिली.मात्र,या सर्व अडथळ्यांना पार करत त्याने आपला मार्ग शोधला.त्याचा संघर्ष आणि साधेपणा प्रेक्षकांना भावला.प्रेक्षकांनीही त्याला तशीच दाद दिली आणि आज सूरज चव्हाण हे नाव घराघरात पोहोचले.
बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात विजयी ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. या पर्वातील ट्रॉफीसह विजेत्या सूरजला पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसस्वरुपात १४ लाख ६० हजारांचा चेक मिळाला. त्यासह कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स यांच्याकडून सूरजला १० लाख रुपयांचा धनादेश जाहीर करण्यात आला.एक इलेक्ट्रिक बाईकही त्याला बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.सोबतच,दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणाही केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!