Saturday, August 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपतीला वटणीवर आणण्यासाठी पत्नीने पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे ही क्रूरताच...

पतीला वटणीवर आणण्यासाठी पत्नीने पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे ही क्रूरताच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पतीच्या वागण्यात सुधारणा करण्यासाठी पत्नीने पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे ही क्रूरताच आहे.विवाहित जोडप्याने सामान्यपणे राखलेल्या सुसंवादी नातेसंबंधात अशा प्रकारच्या कृत्याला स्थान मिळवू शकत नाही; असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देतांना कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.त्यामुळे घटस्फोट मंजूर करण्यात आले.महिलेने पती व सासरच्या लोकांविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती.यामुळे पती व त्याच्या घरच्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे महिलेचे कृत्य क्रूरतेसमान ठरते,असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने दाम्पत्याला घटस्फोट मंजूर केला होता.
कुटुंब न्यायालयाचा हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला.पत्नीने पतीचे वर्तन सुधारण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली होती.तसेच त्या तक्रारीत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.मात्र,सुखी संसारात अशा प्रकारच्या खोट्या फौजदारी तक्रारींना स्थान देऊ शकत नाही; असे खंडपीठाने म्हटले आहे.विवाह ज्या पायावर उभा आहे,त्या आवश्यक मूल्यांना एकदा खोट्या आरोपांमुळे धक्का बसला की पती किंवा पत्नीने विवाहाची पवित्रता कायम ठेवण्यासाठी सर्व तर्कसंगतता गमावली हे निश्चित असते.त्यामुळे घटस्फोटाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते.पती-पत्नीपैकी कुणी एकाने फौजदारी खटल्याची कठोर कारवाई सुरु केली असेल तर ती कारवाई क्रूरता ठरते तसेच ती कारवाई हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३(१) (१ए) अन्वये घटस्फोटाचा आधार ठरते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!